ढोल बडवून सांगणाऱ्यांची अक्कल गहाण पडली, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका !

ढोल बडवून सांगणाऱ्यांची अक्कल गहाण पडली, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेचा दारूण पराभव कसा झाला हे ढोल बडवून सांगणाऱ्यांची अक्कल गहाण पडली असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच कोणतीही निवडणूक सत्ता व धनाचा वापर करून जिंकायची हे भाजपाचे धोरण आहे. हाऊसिंग फेडरेशनचा विजय मोठा वाटणाऱ्यांना उद्या पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाने एकतर्फी निवडणूक जिंकल्याचा दावा माध्यमांनी केला असला तरी ते भाजपाप्रणीत ‘रगडापेटीस, ढोकला छाप’ असा सर्वपक्षीय विजय असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.तसेच असा विजय काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएमच्या मदतीने मिळाला तरी त्या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वास दिले जाते, हा मोठाच विनोद असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS