मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्लीत, पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधींची घेणार भेट!

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्लीत, पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधींची घेणार भेट!

नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी संध्याकाळी 5.30 वाजता उद्धव ठाकरे दाखल होतील. तर सहा वाजता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेटीला जाणार आहेत. त्यानंतर साडेसात वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची ते भेट घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा होणार हे पाहण गरडेचं आहे.

दरम्यान मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राजधानीत जाणार आहेत. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं होतं. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजकीय रंग न देण्याचं आवाहन ट्विटरवरुन केलं होतं. परंतु शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदाच चर्चा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS