मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यपाल नियुक्त दोन जागा रिक्त आहेत. त्यातल्या एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ते विधानपरिषदेचं सदस्यत्व स्वीकारणार आहेत.

दरम्यान मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं संविधानानुसार बंधनकारक असतं. अन्यथा, मंत्र्याचं पद धोक्यात येण्याची शक्यत असते. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याला पाच महिने होत आले आहेत. अशातच कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

COMMENTS