…तर मी निवडणूक लढणार नाही,   उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला निरोप ?

…तर मी निवडणूक लढणार नाही, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला निरोप ?

मुंबई – विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनं दोन उमेदवार जाहीर केले आहेत.विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी या दोघांना उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. असंच सुरु राहिलं तर आपण निवडणूक लढणार नाही, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान विधान परिषदेत भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 3 , काँग्रेस 2 आणि शिवसेनेचे 1 सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून येतील असा दावा केला जात असताना, काँग्रेसने सहाव्या जागेवर दावा केला आहे. त्यानुसार आता शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसही 2 जागा लढणार आहेत. तर दुसरीकडे भाजपने संख्याबळानुसार 4 जागांवर दावा केला आहे. परंतु आता महाविकास आघाडीने सहावा उमेदवार दिल्याने, भाजपही आणखी एक उमेदवार देऊ शकतो असं बोललं जात आहे.

COMMENTS