उद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा आणि मराठा क्रांती पक्षावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया ! व्हिडिओ

उद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा आणि मराठा क्रांती पक्षावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया ! व्हिडिओ

कराड – राष्ट्रवादी काँग्रेसचे साता-याचे खासदार उदयनराजे भोसले आज कराडमध्ये आले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन उदयनराजे यांनी घेतलं. यावेळी त्यांना पत्रकारांनी गाठलं. नेहमीच्या शैलीत त्यांनी विविध विषयांवर आपली रोठठोक मते मांडली. राम मंदिर आणि उद्धव ठाकरे यांच्या आयोध्यादौ-यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. तसंच आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवणार की भाजपकडून की मराठा क्रांती पक्षाकडून या प्रश्नावरही त्यांनी मार्मिक टोलेबाजी केली. तसंच मराठा आरक्षणाबाबत आपली रोखठोक मते व्यक्त केली.

COMMENTS