“उदयनराजेंचा मी राजकीय प्रतिस्पर्धी नाही, मी त्यांचा आदर करतो !”

“उदयनराजेंचा मी राजकीय प्रतिस्पर्धी नाही, मी त्यांचा आदर करतो !”

पंढरपूर – उदयनराजे भोसले यांचा मी प्रतिस्पर्धी नाही उलट मी त्यांचा आदर करतो. ते राजे आहेत. असं वक्तव्य कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले आहे. माथाडीचा एक कार्यकर्ता म्हणून मला महामंडळाचे चांगले काम करायचे आहे. सातारच्या लोकसभेच्या जागे संदर्भात मी इच्छुक नाही असंही उदयनराजे भोसले यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजप नेत्यांनी उदयनराजेंचे भाजपमध्ये स्वागत करू असे वक्तव्य केले होते. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंची पाठराखण केली आहे. अशातच आज चंद्रकांत पाटील आणि उदयनराजे यांच्यात बैठक झाली. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS