शेतकरी आणि बेरोजगारांना मोदी सरकार देणार नवीन गिफ्ट?

शेतकरी आणि बेरोजगारांना मोदी सरकार देणार नवीन गिफ्ट?

नवी दिल्ली – देशभरातील शेतकरी आणि बेरोजगारांना मोदी सरकार नवीन गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मोदी सरकार युनिव्हर्सल बेसिक इन्कम(युबीआय) आणण्याचा विचार करत आहे. जर युबीआय लागू करण्याची परवानगी मिळाली तर 2019 लोकसभा निवडणुकीआधी देशातील नागरिकांना ठराविक रक्कम दिली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान सध्या काही राज्यांमध्ये ही योजना लागू असून  देशभरात ही योजना कधी लागू केली जाईल याची अधिकृत घोषणा झालेली नाही. सरकारकडून सादर करण्यात येणाऱ्या शेवटच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच कृषी मंत्रालयाकडूनही यासंबंधी माहिती मागवण्यात आली असून इतर मंत्रालयांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. ही योजना फक्त शेतकऱ्यांना लागू करण्यात यावी की यामध्ये बेरोजगारांचाही समावेश केला जावा अशी विचारणा करण्यात आली असून यासाठी सरकारकडून एक समितीही गठीत केली जाणार असल्याची माहिती आहे. या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

COMMENTS