यूपीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा होमपिचवर पराभव, शिवसेनेनं भाजपला डिवचलं !

यूपीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा होमपिचवर पराभव, शिवसेनेनं भाजपला डिवचलं !

उत्तर प्रदेशात भाजपने महापालिका निवडणुकीत ऐतिहासीक विजय मिळवला असला तरी नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपला महापालिकांप्रमाणे नेत्रदिपक यश संपादन करता आलेलं नाही. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या होमपिचवर पराभवाचा फटका बसला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं होमपिच म्हणज्ये गोरखपूर. या महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. मात्र योगी आदित्यानाथ यांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं. त्या वॉर्डामध्ये भाजपचा पराभव झाला आहे. गोरखपूरच्या वॉर्ड क्रमांक 68 मध्ये अपक्ष उमेदवार नादिरा खातून यांनी भाजपच्या उमेदवार माया त्रिपाठी यांचा तब्बल 483 मतांनी पराभव झाला आहे.

तोच प्रकार उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांच्या घरच्या मैदानावर झाला आहे. केशव प्रसाद मौर्या यांचं मतदान असलेल्या नगर पंचायतीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. यावरुन शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे. सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. यूपीमध्ये ज्या बुथवर योगी आदित्यनाथ यांनी मतदान केलं. त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला. हा निकाल संपूर्ण उत्तर प्रदेशाला कधीच अपेक्षीत नव्हता. उपमुख्यमंत्र्यांच्या भागात तब्बल 6 नगरपंचायतीमध्ये भाजपचा पराभव झाल्याचंही सामनामध्ये म्हटलं आहे.

COMMENTS