EXIT POLL – उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा हादरा ?

EXIT POLL – उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा हादरा ?

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक 2019 मधील सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज अखेर संपली आहे. लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. मतदानानंतर आता निकाल कोणाच्या बाजूनं लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणता पक्ष सत्तेच्या खुर्चीत विराजमान होणार? याचे निकाल 23 मे रोजी स्पष्ट होणार आहेत. परंतु त्यापूर्वी विविध संस्था आणि न्यूज चॅनल्सनी एक्झीट पोल जाहीर केले आहेत. एबीपी- नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा हादरा बसणार असल्याचं बोललं जात आहे. याठिकाणी सपा- बसपा – ५६, काँग्रेस – २ आणि भाजपाप्रणीत एनडीए- २२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

तसेच त्याचबरोबर इंडिया टुडे- अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार  मध्य प्रदेशमध्ये भाजपाला २२ ते २६, काँग्रेसला १ ते ३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान एबीपी- नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा हादरा बसणार असल्याचं दिसत आहे. याठिकाणी सपा- बसपा – ५६, काँग्रेस – २ आणि भाजपाप्रणीत एनडीए- २२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हा अंदाज खरा ठरणार का हे 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

 

COMMENTS