रामाची सिता पहिली टेस्ट ट्यूब बेबी, भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांनी तोडले अकलेचे तारे !

रामाची सिता पहिली टेस्ट ट्यूब बेबी, भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांनी तोडले अकलेचे तारे !

नवी दिल्ली – रामाची सिता पहिली टेस्ट ट्यूब बेबी होती असे अकलेचे तारे उत्तर प्रदेशमधील भाजपचे उपमुख्यमंत्री  दिनेश शर्मा यांनी तोडले आहेत. सिताजींचा जन्म एका घड्यात झाला होता. त्यावेळी टेस्ट ट्यूब बेबींना जन्म  देण्याची ही पद्धत असल्याचं शर्मा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सिताजी या पहिली टेस्ट ट्यूब बेबी होत्या असं त्यांनी म्हटलं आहे. मथुरा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 नारदमुनी पहिले पत्रकार

दरम्यान नारदमुनी हे पहिले पत्रकार होत असं यावेळी दिनेश शर्मा यांनी म्हटलं आहे. पत्रकारीता ही आधुनिक काळातली नसून महाभारतापासूनच चालत आली असल्याचंही दिनेश शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच  गुरुत्वाकर्षण बल, प्लास्टिक सर्जरी आणि परमाणुचा शोध पहिला भारतात लागला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महाभारतावेळी लाइव टेलीकास्ट 
महाभारतावेळी लाइव टेलीकास्ट झाला असून महाभारतातील संजय हा हस्तिनापुरमध्ये बसून कुरुक्षेत्रातील माहिती धृतराष्ट्र यांना देत होता. हे लाइव टेलिकास्ट नाही तर काय आहे असंही दिनेश शर्मा यांनी म्हटलं आहे.

COMMENTS