अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

नवी दिल्ली –  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. परंतु मी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही किंवा निवडणुकीनंतर पक्ष सोडणार नाही असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उर्मिला मातोंडकरला लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवणार असल्याचं बोलसं जात आहे. मी आज सक्रीय राजकारणात प्रवेश करत आहे. माझे कुटुंब महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विचारधारेला मानते. संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला मिळाल्या असल्याची प्रतिक्रिया मातोंडकर यांनी दिली आहे.

COMMENTS