उर्मिला मातोंडकर यांच्या सभेदरम्यान भाजपा समर्थकांचा गोंधळ, भाजपानेच गुंड पाठवल्याचा आरोप!

उर्मिला मातोंडकर यांच्या सभेदरम्यान भाजपा समर्थकांचा गोंधळ, भाजपानेच गुंड पाठवल्याचा आरोप!

मुंबई – उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी बोरिवली येथे प्रचारसभा घेतली. यावेळी भाजपा समर्थकांनी गोंधळ घातला होता. भाजपा समर्थकांनी नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी केली. त्यानंतप काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते. सभा शांततेत सुरु असताना भाजपानेच सभेत गुंड घुसवले असल्याता आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1117691593451085826?s=19

दरम्यान व्यवस्थित परवानगी घेऊन सभा घेत होती. अत्यंत शांत मार्गाने सभा सुरु असताना भाजपाचे गुंड लोक आले होते. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आमच्या लोकांनी आधी दुर्लक्ष केलं. पण नंतर त्यांनी अश्लील, विभत्स हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलांमध्ये दहशत पसरवण्याचं प्रयत्न केला’. त्यांनी जाणुनबुजून महिलांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. पकडण्यासाठी गेले असता सगळ्यांनी पळ काढला असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. तसेच पोलीस संरक्षणाती मागणी देखील त्यांनी केली आहे.

COMMENTS