माजी न्यायमू्र्ती पी बी सावंत यांचे निधन

माजी न्यायमू्र्ती पी बी सावंत यांचे निधन

पुणे – माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन झाले आहे. पुण्यात राहत्या घरी सकाळी साडे नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून पी बी सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते.

पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती.

COMMENTS