सपा-बसपा आघाडीचा भाजपला मोठा फटका, युपीत फक्त 18 जागा मिळणार, इंडिया टुडेचा सर्वे !

सपा-बसपा आघाडीचा भाजपला मोठा फटका, युपीत फक्त 18 जागा मिळणार, इंडिया टुडेचा सर्वे !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहूजन समाज पार्टीनं आघाडी केली आहे. या आघाडीचा भाजपला जोरदार फटका बसणार असल्याचं दिसत आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने केलेल्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. आज निवडणुका झाल्या तर भाजपाला १८ सपा-बसपा आघाडीला ५८ जागांवर विजय मिळेल असा अंदाज इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सच्या सर्वेचा अंदाज आहे. तसेच काँग्रेस उत्तर प्रदेशात चार जागा जिंकेल असा देखील अंदाज या सर्व्हेतन व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे उत्तर प्रदेशात आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी कठिण असल्याचं दिसत आहे.

दरम्यान २०१४ लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाने घवघवीत यश संपादन केले होते.याठिकाणी भाजपाला तब्बल ७१ जागांवर विजय मिळाला होता. अपना दल-भाजपा आघाडीने ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. त्यामुळे केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे याठिकाणी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा असतो.

COMMENTS