‘या’ जागेवरुन प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहूजन आघाडीत बिघाडी?

‘या’ जागेवरुन प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहूजन आघाडीत बिघाडी?

औरंगाबाद – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारिप बहूजन महासंघ आणि एमएमआयच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. अशात एका जागेवरुन या आघाडीत बिघाडी येत असल्याचं दिसत आहे. औरंगाबाद लोकसभेसाठी माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी बाहेरचा उमेदवार लोकसभेसाठी देण्यापेक्षा एमआयएमकडून आमदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे या जागेवरुन मोठा तिढा निर्माण झाला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्यात औरंगाबाद हा एमआयएमचा गड मानला जातो. या शहरानेच पक्षाला पहिला आमदार, महापालिकेत चोवीस नगरसेवक आणि विरोधीपक्षाचा नेता दिला. शहरी भागात एमआयएमची मोठी ताकद आहे. त्यामुळे याठिकाणी लोकसभेची जागा देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे याबाबत आता प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS