पुणे –  माजी आमदार वसंततात्या थोरात यांचं निधन !

पुणे – माजी आमदार वसंततात्या थोरात यांचं निधन !

पुणे – माजी आमदार आणि अखिल मंडई मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंततात्या थोरात यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.आज वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. वसंततात्या थोरात हे अखिल मंडई मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने युद्ध आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये भरीव सहभाग घेतला आहे. 1974-75 या वर्षात त्यांनी पुण्याचे महापौरपद सांभाळले. 1991 मध्ये त्यांची आमदार म्हणून निवड झाली. त्याचप्रमाणे त्यांनी आणीबाणीच्या काळात 1977 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली होती.  झुणका भाकर महाराष्ट्रत प्रथम 1973 मध्ये त्यांनी सुरवात केली. तसेच 1974 महापौर चषक कबड्डी स्पर्धेला सुरुवातही त्यांनी केली.

भुषवलेली पदे

काँग्रेस शहराध्यक्ष.

पुणे महापौर 1974 – 1975

आमदार – 1991

पुणे लोकसभा उमेवार 1977

संस्था  –

अखिल मंडई मंडळ

मानदसचिव – शिवाजी मराठा सोसायटी

खजिनदार- अखिल भारतीय मराठा शिक्षण परीषद

विश्वस्त – सदगुरु शंकर महाराज ट्रस्ट

अध्यक्ष  – बदामी हौद संघ

COMMENTS