माझ्या गाडीवर हल्ला ‘त्यांनीच’ केला – अनिल गोटे

माझ्या गाडीवर हल्ला ‘त्यांनीच’ केला – अनिल गोटे

धुळे – धुळे महापालिका मतदानाच्या पूर्वसंध्येलाच भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कल्याण भवन जवळ दोन जणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली. या घटनेत वाहनाचे पुढील काच फुटले असून यावेळी गोटे गाडीमध्ये नसल्याने ते बचावले आहे. परंतु गोटे यांचा बीपी वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माझ्या गाडीवर भाजपाच्या गुंडांनीच हल्ला केला असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. पोलिसांना भाजपानं मॅनेज केलंय, पोलीस चोर आहेत. विकले गेले आहेत. काय गुन्हा दाखल करणार? परवा कार्यकर्त्यावर हल्ला झाला तेव्हा ही पोलिसांनी काय केले? उलट त्याच्यावरच 307 कलमानुसार गुन्हा दाखल केला, त्यामुळे मी आता गुन्हा दाखल करणार नसल्याचं अनेल गोटेंनी म्हटलं आहे.

दरम्यान अहमदनगर, धुळे महापालिकेसाठी आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली आहे. अहमदनगरमध्ये शांततेचं वातावरण पहावयास मिळत आहे. परंतु धुळे महापालिकेत तणावपूर्ण वातावरण पहावयास मिळत आहे. याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे.

COMMENTS