विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून प्रसाद लाड तर काँग्रेसकडून दिलीप माने यांनी भरला उमेदवारी अर्ज

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून प्रसाद लाड तर काँग्रेसकडून दिलीप माने यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याचे पत्ते काँग्रेस आणि भाजप दोनही पक्षांनी लवकर उघड केले नाहीत. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने पक्षाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना उमेदवारी अर्ज भरला आहे. तर काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप मानेंना उमेदवारी अर्ज  भरला आहे.

भाजपा विधानपरिषद उमेदवार प्रसाद लाड हे भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, यासह विधान भवन येथे दाखल झाले होते.  शिवसेनेचे एकनाथ शिंदे, मिलींद नार्वेकर, रवींद्र वायकर, निलम गोरे आदी उपस्थित होते.

विधान भवन येथे आलेत आहेत.दरम्यान, येत्या 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राणे यांनी तब्बल 2 तास चर्चा केल्याचे समजते. या भेटीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत प्रसाद लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपने दुसऱ्या वेळी माधव भंडारी यांना डावलले आहे. या आधीही पक्षाने काँग्रेसमधून आलेल्या आर पी सिंग यांना उमेदवारी दिली होती. तर यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजीचा सुरू आहे. दुसरीकडे राजकीय हतबल झालेल्या नारायण राणे यांनाही भाजपने वाट पाहण्यास सांगितले आहे.

COMMENTS