विरोधकांची 15 मते फुटली, शिवसेनेने पाठिंबा काढला तरीही भाजपकडे बहुमत ! कसं ? वाचा बातमी

विरोधकांची 15 मते फुटली, शिवसेनेने पाठिंबा काढला तरीही भाजपकडे बहुमत ! कसं ? वाचा बातमी

मुंबई – विधान परिषदेच्या आज झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांनी अपेक्षेप्रमाणे सहज विजय मिळाला. त्यांना 209 तर आघाडीचे दिलीप माने यांना 73 मते मिळाली. या निवडणुकीने नेमका काय संदेश दिला त्यावर आता आपण नजर टाकणार आहोत.

भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना 194 मते मिळणे अपेक्षीत होते. मात्र त्यापेक्षा त्यांना तब्बल 15 मते अधिकची मिळाली. त्यामुळे आघाडीची तब्बल 15 मते फुटली आहेत. लाड यांना भाजपची 122, शिवसेनेची 62, बहुजन विकास आघाडीची 3 आणि 7 अपक्ष अशी 194 मते मिळणे अपेक्षीत होते.

काँग्रेसचे दिलीप माने यांना 88 मतं मिळणं अपेक्षीत होतं. मात्र त्यांना तब्बल 15 कमी म्हणजेच 73 मते मिळाली. काँग्रेसची 42, राष्ट्रवादीची 40, शेकाप 3, सपा 1, माकप 1, भारिप 1 अशी एकूण 88 मते मिळणे अपेक्षीत होते.

एमआयएमच्या 2 आमदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. तर छगन भुजबळ आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेसाठी एक गंभीर संदेश दिला आहे. शिवेसनेनं पाठिंबा काढला तरी भाजपकडे बहुमत राहु शकते. लाड यांना मिळालेल्या 209 मतांमधून शिवसेनेची 62 मते वगळली तरी भाजकडे 147 मते राहतात. बहुमतासाठी 145 मतांची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरीही भाजपला काही धोका नाही असाच संदेश भाजपने दिला आहे.

COMMENTS