विधान परिषदेच्या  ६ जागांसाठी २१ मेला मतदान !

विधान परिषदेच्या  ६ जागांसाठी २१ मेला मतदान !

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण देण्यात येणा-या ६ जागांसाठी येत्या २४ मेला मतदान होणार आहे. तर मतमोजणी २४ मेला होणार आहे. त्याबाबतची अधिसुचना निवडणूक आयोगाने काढली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था, परभणी हिंगोली, लातूर –बीड – उस्मानाबाद, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

यापैकी सध्या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. दोन जागा भाजपच्या ताब्यात तर एक जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही प्रमाणात ताकद वाढली आहे. त्याचा काही प्रमाणात फायदा भाजपला होणार आहे. मात्र आता शिवसेना भाजप एकत्र लढतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही पक्ष वेगळे लढल्यास त्याचा तोटाही भाजपला आणि शिवसेनेला बसू शकतो.  कोणत्या आहेत ६ जागा आणि तिथे कोण आमदार आहेत. त्यावर एक नजर टाकूयात….

1) जयवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस – नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था

2) अनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस – कोकण स्थानिक स्वराज्य संस्था

3) बाबाजानी दुर्रानी, राष्ट्रवादी काँग्रेस – परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था

4) दिलीपराव देशमुख, काँग्रेस – उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था

5) प्रविण पोटे-पाटील, भाजप – अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था

6) मितेश भांगडीया, भाजप – वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था

COMMENTS