विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह ‘या’ नेत्याला उमेदवारी तर राष्ट्रवादीकडून यांना मिळणार संधी?

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह ‘या’ नेत्याला उमेदवारी तर राष्ट्रवादीकडून यांना मिळणार संधी?

मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख आणि कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला असून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आहेत. त्यात एका जागेसाठी नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर व “राष्ट्रवादी’चे विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.  तर दुसरी जागा नाशिक विभागासाठी आहे. या विभागातून आमदार हेमंत टकले यांची जागा रिक्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर नाशिक विभागातूनच संधी मिळावी, अशीही पक्षात चर्चा सुरू आहे. पक्षातर्फे विधान परिषदेसाठी आक्रमक नेतृत्व असलेले पारोळा येथील माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

COMMENTS