विधानपरिषदेच्या चार जागांचा थोड्याच वेळात निकाल, मतमोजणी सुरु !

विधानपरिषदेच्या चार जागांचा थोड्याच वेळात निकाल, मतमोजणी सुरु !

मुंबई – विधानपरिषदेच्या चार जागांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला करण्यात येत आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली होती. सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे. त्यामुळे मतमोजणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार
भाजप : निरंजन डावखरे
राष्ट्रवादी काँग्रेस : नजीब मुल्ला
शिवसेना : संजय मोरे

मुंबई पदवीधर मतदार संघ – पक्ष आणि उमेदवार
भाजप : अॅड. अमितकुमार मेहता

शिवसेना : विलास पोतनीस

काँग्रेस आघाडी आणि शेकापचे राजेंद्र कोरडे

लोकभारती : जालिंदर सरोदे

अपक्ष ( मनसे, स्वाभिमानी पुरस्कृत) : राजू बंडगर

अपक्ष : डॉ. दीपक पवार

मुंबई शिक्षक मतदारसंघ

मुंबई शिक्षक मतदारसंघ : पक्ष आणि उमेदवार
शिवसेना : शिवाजी शेंडगे
लोकभारती : कपिल पाटील
अपक्ष (भाजप पुरस्कृत) : अनिल देशमुख

नाशिक शिक्षक मतदारसंघ उमेदवार

संदीप बेडसे – महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा)

शिवसेना –  किशोर दराडे( विधानपरिषदेत नुकतेच विजयी झालेल्या नरेंद्र दराडेंचे बंधू)

भाजप – अनिकेत पाटील, ( माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव)

COMMENTS