काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या “या” दोन आमदारांची मते भाजपला !

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या “या” दोन आमदारांची मते भाजपला !

मुंबई – विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. आतापर्यंत बहुतांशी आमदारांनी मतदान केलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसचं एक किंवा दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचं 1 मत फुटलं आहे. छगन भुजबळ मतदान करण्यासाठी आले नाहीत. तर शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांना न्यायालयानं मतदानासाठी बंदी घातलेली आहे.

आतापर्यंत झालेल्या मतदानावरुन भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्य़ंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नितेश राणे यांनी आपण प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे संकेत दिले आहेत. त्याचसोबत कालिदास कोळंबकर यांनीही भाजपला मतदान केल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीचे तुरुंगातील आमदार रमेश कदम यांनी थेटपणे आपण भाजप उमेदवार प्रसाद लाड यांना मतदान केल्याचं सांगितलं आहे.

COMMENTS