छगन भुजबळांबाबत शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडेंचा खळबळजनक दावा !

छगन भुजबळांबाबत शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडेंचा खळबळजनक दावा !

नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मदत शिवसेनेच्या विजयाला लाभली असल्याचा खळबळजनक दावा नाशिक विधान परिषदेतील शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला आहे. खरं तर भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे हे विजयी होणार असल्याचं बोललं जात होतं परंतु तरीही नरेंद्र दराडे हे 200 मतांनी विजय झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी-भाजपला जोरदार धक्का बसला आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून शिवसेना आणि छगन भुजबळ यांची जवळीकता वाढत असल्याचं दिसून येत आहे. तरुंगातून सुटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शिवाय पंकज भुजबळही ‘मातोश्री’वर भेटीला गेले होते. महत्वाचं म्हणजे शिवसेनेशी जुने ऋणानुंबध आहेत, असं विधान त्यावेळी भुजबळांनी केलं होतं. याशिवाय नुकतंच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंर आता शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS