पंतप्रधान, मुख्यमंत्र्याप्रमाणे वि.प. आमदाराची निवड को होऊ नये ?

पंतप्रधान, मुख्यमंत्र्याप्रमाणे वि.प. आमदाराची निवड को होऊ नये ?

मुंबई –  नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडूण देण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकीचे बरेच निकाल धक्कादायक लागले. या निवडणुकीध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याची कुजबूज होती. कुठे एका मतदाचा भाव हा 2 लाखापासून ते 7 लाखापर्य़ंत असल्याची चर्चा दबक्या आवाजात होती. ही चर्चा खोटी होती असं म्हणणंही तितकंसं बरोबर ठरणार नाही. या निवडणुकीसाठी उभे राहिलेले सर्वच उमेदवार हे जणूकाही लक्ष्मीपूत्रच होते. त्यावरुन  त्या निवडणुकीतल खर्चाचा आपल्याला अंदाज येईल.

निकाल लागेलेल्या पाचही मतदारसंघात कागदावरच्या निकालापेक्षा वेगळे निकाल लागले. कोकणात राष्ट्रवादीच्य अनिकेत तटकरे यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. तीच परिस्थिती नाशिकमध्ये दिसली. शिवसेनेची मते 200 असताना त्यांच्या उमेदवाराला मात्र तब्बल 400 मते मिळाली. तिकडे हिंगोली परभणीमध्ये आघाडीची मते कितीतरी जास्त असताना शिवसेनेचा उमेदवार तिथून विजयी झाला. विशेष म्हणज्ये विजयी उमेदवार हा जिल्ह्यातील सोडा, मराठवाड्यातीलही नाही. तो विदर्भाचा आहे. अमरावती मतदारसंघातर काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ17 मते मिळाली. तर चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघात भाजपची मते जास्त असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराने  जोरदार लढत दिली.

सर्वच जागांवर विजयी उमेदवाराला त्याच्या कागदावरच्या ताकदीपेक्षा जास्त तर कुठे कमी मते मिळाली. काही ठरावीक उमेदवारांना झालेले मतदान के काही कोणाच्या प्रेमापोटी झालं असण्याची शक्यता तशी बरीच कमी आहे. किंवा त्याचे प्रमाणत तरी नक्कीच कमी असणार. ती मते कशी वळाली याच्या सुरस कथा खाजगीत ऐकायला मिळतात. मतदान खेचण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू होती.
हे सर्व पाहिल्यानंतर पैसे नसणारा इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून देण्यात येणा-या विधान परिषदेत आमदार होऊ शकणार नाही का ? केवळ पैसे वालेच इथे निवडणूक लढवणार का ?  असं होणार असेल तर मग निवडणूक घ्यायचीच कशाला ? असे एक ना अनेक प्रश्न पडतात. त्याचबरोबर  प्रत्यक्ष मतदानाने निवडूण आलेले आमदार उघड मतदानाने मुख्यमंत्री निवडतात, प्रत्यक्ष मतदानाने निवडूण आलेले खासदार पंतप्रधान निवडतात तर मग प्रत्यक्ष मतदानाने निवडूण आलेले स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी त्यांचा आमदार उघड मतदाने का निवडू शकत नाहीत ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

तुम्हाला याबाबत काय वाटतं ?  हे आम्हाला जरुर कळवा. [email protected] या मेल आयडीवर आम्हाला मेल करा. काही ठरावीक चांगल्या मतांना आम्ही आमच्या वेबसाईटवर प्रसिद्धी देऊ.

COMMENTS