ब्रेकिंग न्यूज – विधान परिषदेचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने !

ब्रेकिंग न्यूज – विधान परिषदेचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने !

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. पहिला निकाल भाजपच्या बाजुने लागला आहे. धुळे नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अमरिष पटेल विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटील यांचा पराभव केला. अमरीष पटेल यांना 332 मंत पडली आहेत. तर काँग्रेसचे अभिजीत पाटील यांना केवळ 98 मतांवर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे पटेल हे तब्ल 234 मतांनी विजयी झाले आहेत.

काहीप्रमाणात का होईना ही लढत चुरशीची होईल अशी शक्यता होती. मात्र ती खूपच एकतर्फी झाली. महाविकास आघाडीकडून अब्दुल सत्तार, के सी पाडवी या मंत्र्यांनी प्रचार केला होता. त्याचा काहीही फायदा झालेला दिसत नाही. एकनाथ खडसेही फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. पदवीधर आणि शिक्षक या 5 जागांसाठी मतमोजणी सध्या सुरू आहे.

COMMENTS