दहावी-बारावी परिक्षांसाठी हा पर्याय – विजय वड्डेटीवार

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. वाढती संख्या लक्षात घेऊन सरकार काही महत्त्वाचे पाऊलं उचणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. राज्यात पुढच्या दोन महिन्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊ घातल्या आहेत. या परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. मात्र, सध्या या परीक्षांवर कोरोनाचं सावट आहे. या परीक्षांवर तमीळनाडू पॅटर्नसारखा योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये मिशिन बिगीन अंतर्गत विविध भागात शाळा उघडण्यात आल्या. मात्रा, शाळा, महाविद्यालय उघडल्यानंतर काही दिवसांमध्येच अनेक शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. काही शाळांमध्ये तर कोरोनाचा स्फोट झाल्याचं बघायला मिळालं आहे. त्यामुळे बहुसंख्य शाळा बंद करून आॅनलाईन शिक्षण सुरू आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी काल (25 फेब्रुवारी) 9 वी ते 11 वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लेखी परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे 2020-21 या वार्षिक वर्षातील विद्यार्थ्यांची कोणतीही लेखी परीक्षा न घेता त्यांना पास घोषित करण्यात येईल, अशी घोषणा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातीही तसे पावलं उचलली जाण्याची शक्यात असू शकते. कारण विजय वडेट्टीवार यांनी त्याचप्रकारचे संकेत दिले आहेत.

COMMENTS