त्यामुळे सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल कराव – विजय वडेट्टीवार

त्यामुळे सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल कराव – विजय वडेट्टीवार

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना काल रात्री घडली. त्यात एक वाडी वाहून जाऊन काही लोक बेपत्ता झाले आहेत, तसेच काही मृतदेह हाती लागले आहेत.यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्यामुळे झालेले मृत्यू सरकारच्या अनास्थेचे बळी आहेत. त्यामुळे सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दरम्यान सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तत्कालीन स्थानिक आमदार यांनी धरण बांधतांना भ्रष्ट्राचार केला, तेव्हा प्रथम जवाबदारी स्थानिक आमदार आणि संबंधित कंपनीची, कंत्राटदारांची आहे. यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. शिवसेना आमदार सदानंद यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळे आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करावा. तसेच
नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीहा
विजय वडवेट्टीवर यांनी केली आहे.

तसेच एक वर्षापासून गावकरी तक्रार करत आहेत, धरण फुटेल हे सांगत होते, तेव्हा या भागातील अधिकारी – लोकप्रिनिधी झोपले होते का ? असा सवालही त्यांनी केला आहे. एक दोन महिन्यापूर्वी दुरुस्ती केली होती, मग धरण कसे फुटले ?, या दुर्घटनेत जे बळी गेले आहेत ते सर्व सरकारच्या अनास्थेचे बळी आहेत, याचे काय प्रायश्चित सरकार घेणार ते सांगावे असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.

COMMENTS