विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट !

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट !

चंद्रपूर – आगामी विधानसभा निलयवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच अजूनही काही दिग्गज नेते भाजप-शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. या आऊटगोईंगवर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अनेक नेत्यांवर दबाव टाकून भाजपमध्ये घेतलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेनेकडून पक्षांतरासाठी मला वारंवार फोन येत असून एक विरोधी पक्ष नेता भाजपमध्ये गेला म्हणून दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेला न्यायचा असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच मला वांद्र्यावरून आतापर्यंत २५ फोन आले असून ते भेटायला बोलवत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

COMMENTS