विजय मल्ल्याला अटक करु नका, सीबीआयचे मुंबई पोलिसांना पत्र, इंडियन एक्सप्रेसच्या बातमीने देशात एकच खळबळ !

विजय मल्ल्याला अटक करु नका, सीबीआयचे मुंबई पोलिसांना पत्र, इंडियन एक्सप्रेसच्या बातमीने देशात एकच खळबळ !

मुंबई – भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्या याच्याबाबत सीबीआयने मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्राचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिले आहे. त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे. या पत्रात सीबीआयने मुंबई पोलिसांना काही गोष्टी सुचवलेल्या आहेत. विजय मल्ल्या भारतात आल्यास त्याला अटक करण्याची गरज नाही. त्याला ताब्यात घ्यायचीही गरज नाही. तो भारतात आल्यावर आम्हाला गुपचूप कळवा असं त्या पत्रात म्हटलं आहे.

            इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या गोपनिय कागदपत्राच्या आधारे हे वृत्त देण्यात आलंय. विजय मल्ल्या याला पकडण्यासाठी सीबीआयने लुकआऊट नोटीस बजावली केली होती, पण ती नोटीस कमकुवत करण्यात आली. नोटीस कमकुवत होणं हा ‘एरर ऑफ जजमेंट’चा भाग होता, असा दावा सीबीआयने केल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेने दिलं होतं. मात्र, सीबीआयनेच मुंबई पोलिसांना विजय मल्ल्याला अटक करू नये, तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप पद्धतीने कळवावे अशा आशयाचं पत्र पाठवलं होतं, असा खळबळजनक खुलासा आता झाला आहे.

सीबीआयनं 16 ऑक्टोबर 2015 रोजी काढलेल्या पहिल्या लूकआऊट नोटीसीमध्ये देश सोडून जाण्यास मज्जाव करावा हा कॉलम भरला होता. त्यामुळे मल्ला देश सोडून जाऊ शकत नव्हता. मात्र त्यानंतर 24 नोव्हेंबर 2015 रोजी दुसरी लूक आऊट नोटीस काढण्यात आली.  त्यामध्ये  त्या कॉलमध्ये देश सोडून जाण्यास मनाई करावी या ऐवजी येण्या – जाण्यासंदर्भात माहिती द्यावी अशी माहिती भरण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी मल्ल्या देशाबाहेर पळाला होता.

COMMENTS