भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार का?, विजयसिंह मोहिते पाटीलांची प्रतिक्रिया!

भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार का?, विजयसिंह मोहिते पाटीलांची प्रतिक्रिया!

सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघात भाजपकडून विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपने तिकीट दिलं तर मी माढ्यातून निवडणूक लढवायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे
विजयसिंह मोहिते पाटील भाजपकडून निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित झालं आहे.

दरम्यान विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह मोहीते पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता विजयसिंह मोहिते पाटील हे देखील लवकरच भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिंदे यांना शह देण्यासाठीभाजप देखील विजयसिंह मोहितेंना तिकीट देणार असल्याचमयं बोललं जात आहे.

COMMENTS