काँग्रेसमधील ‘या’ नेत्यांनी बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची गरज – राधाकृष्ण विखे पाटील

काँग्रेसमधील ‘या’ नेत्यांनी बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची गरज – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई – काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सडचिठ्ठी देणारे आणि भाजपच्या वाटेवर असलेेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या अधोगतीबाबत चिंतन करण्याची गरज असून काँग्रेसचा विषय संपला असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारी अनेक नेते आहेत. या नेत्यांनी आता स्वतःहून बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते संगमनेर येथे बोलत होते.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबतही वक्तव्य केलं आहे. भाजप प्रवेश हा मुद्दा आज राहिलेला नाही.लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केलाय. मोदींच्या भूमिकेचं समर्थन करीत त्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे.मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील.ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS