राधाकृष्ण विखे पाटलांचं काँग्रेसला आणखी एक आव्हान !

राधाकृष्ण विखे पाटलांचं काँग्रेसला आणखी एक आव्हान !

अहमदनगर – भाजपच्या वाटेवर असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला खुलं आव्हान दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नगरमध्ये एकही जागा जिंकू देणार नाही,
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 जागांवर युतीला विजय मिळवून देणार असल्याचा विश्वास विखे यांनी व्यक्त केला आहे. १२ विरुद्ध शून्य अशी परिस्थिती नगर जिल्ह्यात असेल आणि यात कोणतीही अतिशयोक्ती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राधाकृष्ण विखे यांचा भाजपमध्ये केवळ औपचारिक प्रवेश उरला आहे. त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळात कोणतं खातं मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मला पक्षप्रवेश कधी द्यायचा याचा निर्णय भाजपाध्यक्षांचा असेल तसेच मंत्रिपद द्यायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असं ते म्हणाले. विखे यांचे आवडते कृषी खाते त्यांना दिले जाणार की वाढीव एफएसआय प्रकरणात अडचणीत आलेल्या प्रकाश मेहता यांचे गृहनिर्माण खाते बहाल होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS