पीकविमा योजना कोणासाठी शेतकरी की विमा कंपन्यांसाठी ? – विखे पाटील

पीकविमा योजना कोणासाठी शेतकरी की विमा कंपन्यांसाठी ? – विखे पाटील

मुंबई – शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या पीकविमा योजनेचा सर्वाधिक लाभ विमा कंपन्यांनाच झाला आहे. त्यामुळे ही योजना शेतक-यांसाठी आहे की पीकविमा कंपन्यांसाठी आहे. असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला केला आहे.

जवळपास चार हजार कोटींचा विमा या कंपन्यांमध्ये जमा झाला त्यापैकी शेतक-यांना फक्त 1600 कोटी विमा देण्यात आला त्यामुळे जवळपास 2 हजार कोटींच्यावर पीकविमा कंपन्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे ही योजना नक्की कोणासाठी आहे. शेतकरी की विमा कंपन्यांसाठी असा सवाल विखे-पाटील यांनी केला आहे. दरम्यान राज्यातील अनेक गावांमधील शेतक-यांना पीकविमा कंपन्यांनी अपात्र ठरवून त्यांना पीकविमा दिला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे विमाकंपनी मालामाल आणि शेतकरी मात्र हवालदिल झाले असल्याचे दिसत आहे.

दरम्यान 1 ऑक्टोबरपासून पीक विम्याचे पैसे शेतक-यांना उशीरा दिले तर त्यावर 12 टक्के व्याज लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे याचा फायदा शेतक-यांना होणार आहे. यावर बोलत असताना विखे-पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS