राधाकृष्ण विखे-पाटलांची मोठी घोषणा, शेतक-यांना दिलं ‘हे’ आश्वासन !

राधाकृष्ण विखे-पाटलांची मोठी घोषणा, शेतक-यांना दिलं ‘हे’ आश्वासन !

औरंगाबाद – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज राज्यातील शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली आहे. २०१९ मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार असल्याचं आश्वासन विखे पाटील यांनी आज दिलं आहे. फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद येथे जनसंघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन सरकारवरही जोरदार टीका केली आहे.

दरम्यान येत्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आले तर पेट्रोल 60 ते 65 रुपयांच्या आत आणू असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही आ दिले आहे. जालना येथे काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा व दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी ते बोलत होते.

COMMENTS