नाणारवर शिवसेना दलाली करतेय, विखे पाटलांचा घणाघाती आरोप !

नाणारवर शिवसेना दलाली करतेय, विखे पाटलांचा घणाघाती आरोप !

नागपूर – कोकणातील नाणार प्रकल्पावर शिवसेना दलाली करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केला आहे. नाणारबाबत स्थगन प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, मात्र आम्ही बोलण्याच्या आधी शिवसेनेनं विधानसभेत त्यांचं नाटक सुरू केलं असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला आहे. जर शिवसेनेला बोलण्याची संधी दिली तर मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देईन असा इशारा मला विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागला असल्याचंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नाणार विरोधी मोर्चात शिवसेनेच्या घोषणा होत्या, तसेच भाजप जमीन चोर आहे, त्या घोषणा बाहेर देण्याऐवजी शिवसेनेनं सभागृहात द्याव्या अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे. विधानपरिषदेत काल मुख्यमंत्री बोलले तेव्हा शिवसेना शांत होती. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची सेटिंग असून नाणारवर शिवसेना दलाली करत असल्याचं विखे-पाटील यांनी अधिवेशनादरम्यान म्हटलं आहे.

COMMENTS