शिर्डी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी यांचं नाव निश्चित, राधाकृष्ण विखे पाटलांनी सोडवला तिढा!

शिर्डी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी यांचं नाव निश्चित, राधाकृष्ण विखे पाटलांनी सोडवला तिढा!

शिर्डी – शिर्डी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला असून शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी विखे गटाच्या अर्चना उत्तमराव कोते यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप शिवसेना आणि विखे गटांच्या नगरसेवकांच्या घेतलेल्या बैठकीत अर्चना कोते यांच्या नावावर शिक्कामर्तब केलं आहे. तर उपनगराध्यक्षपदी विखे गटाचे मंगेश त्रीभुवन यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या सभागृहातील निवडीची औपचारीकता केवळ बाकी राहिली आहे.

अर्चना कोते

दरम्यान शिर्डीच्या आज होणार्‍या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी विखे गटाचे अभय शेळके, अर्चनाताई कोते, जगन्नाथ गोंदकर या तीन उमेदवारांनी अर्ज भरल्याने तिढा वाढला होता. परंतु हा तिढा विखे पाटील यांनी सोडवला असून नगराध्यक्षपदी अर्चना उत्तमराव कोते यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. तर उपनगराध्यक्षपदीही विखे गटाचे मंगेश त्रीभुवन यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आलं आहे.

मंगेश त्रीभुवन

COMMENTS