कर्नाटक एटीएसमुळे पितळ उघडं पडेल या भीतीपोटीच दाभोळकर हत्येप्रकरणी सरकारकडून अटकसत्र, विखे पाटील यांचा गंभीर आरोप !

कर्नाटक एटीएसमुळे पितळ उघडं पडेल या भीतीपोटीच दाभोळकर हत्येप्रकरणी सरकारकडून अटकसत्र, विखे पाटील यांचा गंभीर आरोप !

कोल्हापूर – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेसाठी आज विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापुरात आले होते. तेंव्हा त्यांनी दिवंगत गोविंदराव पानसरे यांच्या कुटंबियांची भेट घेतली. सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी विचारवंतांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव निर्माण करावा, अशी विनंती करण्यासाठी मी पानसरे कुटुंबियांची भेट घेतली अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

लहान-लहान गोष्टींवरही ट्वीट करून अभिनंदन करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र एटीएसने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संशयीत मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याचे साधे औदार्य दाखवत नाही. यावरून अशा विचारधारेला त्यांचे पाठबळ असल्याचे जाणवते असा आरोपही त्यांनी केला. तसंच कर्नाटक एटीएस गौरी लंकेश प्रकरणी महाराष्ट्रातील आरोपींना उचलेल आणि त्यातून आपले पितळ उघडे पडेल या भीतीपोटीच राज्य सरकारनं दाभोळकर हत्येप्रकरणी अटकसत्र सुरू केल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला आहे.

COMMENTS