माजी मंत्री विलासकाका उंडाळकर-पाटील यांचे निधन

माजी मंत्री विलासकाका उंडाळकर-पाटील यांचे निधन

सातारा – माजी सहकारमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते विलासकाका उंडाळकर-पाटील यांचे आज पहाटे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांनी कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून तब्बल सात वेळा प्रतिनिधित्व केले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली

विलासकाका-पाटील यांचे मूळ गाव कराड तालुक्यातील उंडाळे येथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांचे वडील स्वातंत्रसैनिक होते. विलासकाकांनी १९६२ साली राजकारणात प्रवेश केला. पहिल्यांदा त्यांनी सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली. दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केल्यानंतर त्यांनी १९८० ला कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत धडक मारली. त्यानंतर सलग सात वेळा २०१४ पर्यत ते विधीमंडळात प्रतिनिधित्व करीत होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केले २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कांग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. तेव्हापासून त्यांचा सार्वजनिक जीवनातील वावर कमी झाला होता.

राजकारणाबरोबर त्यांनी सहकारावरत्यांची चांगली पकड होती. कऱ्हाड बाजार समिती, कऱ्हाड खरेदी विक्री संघ, कोयना दूध संघावर त्यांची पकड कायम होती. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकही त्यांच्या ताब्यात होती. या संस्थांना आर्थिक शिस्त लावल्याचे त्यांनी काम केले. त्यामुळे या संस्थांचा लावकीक राज्यभऱ पसरला आहे. विलासकाका यांनी राजकारण, सहकारसोबत स्वातंत्र्यसैनिक अधिवेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही मोठे काम उभे केले. अधिवेशनाला देशभरातील व्याख्याते या अधिवेशनास उपस्थित राहिले. तसेच स्वातंत्रसैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उभे राहिले आहे.

COMMENTS