पंकजा मुंडेंवर काय अन्याय झाला माहीत नाही, परंतु आमच्यावर मात्र अन्याय झाला -विनायक मेटे

पंकजा मुंडेंवर काय अन्याय झाला माहीत नाही, परंतु आमच्यावर मात्र अन्याय झाला -विनायक मेटे

वाशिम – पंकजा मुंडेंवर अन्याय काय झाला हे त्या सांगू शकल्या नाहीत. तर आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सांगत आहे. मात्र तो जाहीरपणे न सांगता नेत्यांना सांगत असल्याचं वक्तव्य शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असून आम्ही भाजपसोबत आहोत. मात्र येत्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत युती झाली नाही तर राज्यातील होऊ घातलेल्या वाशिमसह पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याचंही विनायक मेटे म्हणाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान राज्यातील भाजपा सरकारने बार्टीच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्थेची निर्मिती केली होती. त्यामुळे मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण मिळणार होते. मात्र या सरकारने सारथी संस्थेला स्थगिती दिल्याने मराठा सुशिक्षित बेरोजगारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असल्याचंही विनायक मेेेटे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS