त्यावेळी नॉनमॅट्रिक असलेले राणे चपरासी होते – विनायक राऊत

त्यावेळी नॉनमॅट्रिक असलेले राणे चपरासी होते – विनायक राऊत

रत्नागिरी – ज्या शिवसेनेने नारायण राणेंचा उद्धार केला, तीच शिवसेना त्यांची अधोगती करेल. अशी टीका शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच नारायण राणेंनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी. शिवसेना त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही असही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे. वाटद येथे झालेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

दरम्यान नारायण राणेंना मतदारांनी सिंधुदुर्गमध्ये नाकारले. मुंबईतही नाकारले. मी जेव्हा सेल्स टॅक्‍समध्ये कामाला होतो त्यावेळी नॉनमॅट्रिक असलेले राणे चपरासी होते. ज्या भगव्याने ओळख दिली तीच शिवसेना विसर्जित करण्याची भाषा ते करताहेत. आमची निष्ठा पैशाशी नाही, भगव्याशी आहे. त्यामुळेच फूटपाथवर पेपर विकणारा विनायक राऊत देशातील लोकसभेत आहे. पण कोंबडी विकणारे आजही लोकांना दहशतीत ठेवत असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे.

तसेच निलेश राणेंची डॉक्‍टर ही पदवी त्यांनी विकत घेतली आहे. निष्ठावंत संदीप सावंत यांना अपहरण करून मारण्याचे काम राणेंनी केले असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे.

COMMENTS