भाजपनं तिकीट कापलं, विनोद तावडे म्हणाले…

भाजपनं तिकीट कापलं, विनोद तावडे म्हणाले…

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. तिकीट का मिळालं नाही? याची चर्चा मी पक्षश्रेष्ठींशी नक्कीच करेन. पण आत्ता नेशन फर्स्ट यानुसार पक्षाला दोन तृतीयांश मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार’, असं विनोद तावडेंनी जाहीर केलं आहे. माझ्या मंत्रीपदाच्या काळात तिकीट न देण्यासारखं काही घडलं नाही. त्यामुळे तसंच जर काही असेल, निवडणुका झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेन. जर माझं काही चुकलं असेल, तर पक्षश्रेष्ठी मला सांगतील आणि जर पक्षाचं काही चुकलं असेल, तर ते चूक सुधारतील’, असं विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

दरम्यान तिकीट न मिळाल्यामुळे तावडे नाराज होऊन पक्ष सोडतील असं बोललं डात होतं परंतु मी संघाच्या आणि भाजपच्या मुशीत तयार झालो आहे. मी भाजपला सोडणं शक्यच नाही. तशा चर्चा केल्या गेल्या. आत्ता तरी माझ्यासाठी भाजपला दोन तृतीयांश मतांनी जिंकून आणणं हेच माझं ध्येय आहे. निवडणुका झाल्यानंतर या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल’, असं देखील विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

भाजपनं उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, उच्चशिक्षण आणिसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचं नाव नाही. मुक्ताईनगर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत त्यांची कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. चौथ्या यादीमध्येही नाव नसल्यामुळे विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS