भाजप आमदाराचा महिलेसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल !

भाजप आमदाराचा महिलेसोबत डान्स, व्हिडीओ व्हायरल !

लखनौ – भाजप आमदारानं महिलेसोबत डान्स केला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे या आमदारावर देशभरातून जोरदार टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ रानीगंज विधानसभेतून निवडून आलेले आमदार अभयकुमार उर्फ धीरज ओझा यांनी ‘शराबी’ चित्रपटातील ‘नशा शराब में होता तो नाचती बोतल, नशे में कौन नहीं है ये बताओ तो जरा…लोग कहते है मैं शराबी हूं…।’ या गाण्यावर त्यांनी महिलेसोबत डान्स केला आहे.

दरम्यान धीरज ओझा यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारानं अशाप्रकारच्या कार्यक्रमात महिलेसोबत डान्स करणं हे शोभणीय नसल्याची जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे या आमदारावर भाजप कारवाई करणार का ? असा सवाल केला जात आहे.

 

COMMENTS