राज ठाकरेंच्या भेटीला विश्व हिंदू परिषदेचे नेते

राज ठाकरेंच्या भेटीला विश्व हिंदू परिषदेचे नेते

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची मुंबईतील कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्यसंदर्भात विश्वहिंदू परिषद कोकण प्रांततर्फे वेगवेगळ्या स्तरावर नामांकित सन्माननीय व्यक्तींच्या भेट घेणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. “अयोध्या तीर्थक्षेत्र न्यासतर्फे निधी संकलन अभियान सुरू आहे. त्यासाठी आम्ही राज ठाकरे यांच्याकडे माहिती देण्यासाठी आलो होतो. यात त्यांचं सहकार्य मिळावा यासाठी ही भेट होती. “हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे. राज ठाकरे यांचे नियोजन कसे करायचे, हा त्यांचा अधिकार आहे. पण आम्हाला विचारल्यास विश्व हिंदू परिषद आणि संघाकडून त्यांना नक्कीच मदत मिळेल,” अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर यांनी दिली.

“विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. तसेच राज ठाकरेंनीही त्यांच्याशी बातचीत केली, अशी चांगली देवाण घेवाण झाली. सगळेच राज ठाकरे यांना मदत करायला तयार आहेत. राज ठाकरेंचं मोहन भागवत यांच्यासोबतही चांगलं नातं आहे,” अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

COMMENTS