पालघर आणि भंडारा-गोंदियातल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान, पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर !

पालघर आणि भंडारा-गोंदियातल्या लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान, पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर !

मुंबई  पालघर आणि भंडारा-गोंदियातल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी लागणार असून या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे. व्हीव्हीपॅट मशीन सुरत आणि बडोदा येथून आणण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण 18 उमेदवार रिंगणात आहेत.

पालघर
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.

 भंडारा-गोंदिया

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले हे मैदानात आहेत.गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

COMMENTS