मोदी-ममताच्या वादात खासदाराचा संसार उध्दवस्त

मोदी-ममताच्या वादात खासदाराचा संसार उध्दवस्त

मुंबई : राजकारणामुळे पती पत्नीच्या नात्यात दुरावा कसा निर्माण होतो याचं उत्तम उदाहरण पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालंय. पत्नीनं तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला म्हणून भाजप खासदार पतीनं लगेच घटस्फोटाची नोटीस पाठवून दिलीय. मोदी-ममताच्या वादात खान कुटुंब उध्दवस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
राजकीय वाद केवळ नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्या पुरते आता मर्यादीत राहीले नाहीत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस पक्षामुळे संसार मोडण्याची वेळ भाजप खासदार सौमित्र खान यांच्यावर आलीय. घडलं असं की, विष्णुपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सौमित्र खान आहेत. ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. परंतु आता त्यांच्या पत्नी सुजाता मंडल खान यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय. तृणमूल काँग्रेस मध्ये पत्नीने प्रवेश केल्याचं सौमित्र खान यांच्या मनाला लागलं. त्यातूनच आता सौमित्र खान यांनी पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठविलीय.
भाजपनं दोन दिवसांपूर्वीच टीएमसी, कांग्रेस, सीपीएमचे १० आमदार आणि टीएमसीच्या खासदारांची मेगा भरती केली. त्यानंतर लगेच भाजप खासदाराच्या पत्नीला टीएमसीनं पक्षात घेतलं. भाजपच्या डर्टी पाॅलिटिक्स मुळे तृणमूल काँग्रेस मध्ये दाखल होत असल्याचं सुजाता खान यांनी सांगितलंय. तसंच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातच पश्चिम बंगाल चा विकास शक्स असल्याचं त्या म्हणाल्या.

COMMENTS