पश्चिम बंगालमध्ये भिका-यांची सर्वाधिक संख्या, लोकसभेत माहिती !

पश्चिम बंगालमध्ये भिका-यांची सर्वाधिक संख्या, लोकसभेत माहिती !

नवी दिल्ली – संपूर्ण देशात 4 लाख 13 हजार 760 एवढी भिका-यांची संख्या असून पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिका-यांची संख्या असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी देशभरातील भिका-यांची यादी जाहीर केली आहे. तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर भिका-यांची संख्या असल्याचं या अहवालातून उघड झालं आहे. एकूण ४ लाख १३ हजार ७६० भिका-यांपैकी २ लाख २१ हजार ६७३ पुरुष भिकाऱ्यांचा समावेश असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील भिका-यांची संख्या

पश्चिम बंगालमध्ये ८१ हजार २४४ भिकारी आहेत.

उत्तर प्रदेशात ६५ हजार ८३५ भिकारी

बिहारमध्ये २९ हजार ७२३ भिकारी

 

महाराष्ट्रातील भिका-यांची संख्या

महाराष्ट्रात एकूण २४ हजार ३०७ भिकारी असल्याची माहिती गेहलोत यांनी दिली आहे.

 

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील भिका-यांची संख्या

उत्तराखंड – ३३२० भिकारी

हिमाचल प्रदेशात – ८०९ भिकारी

दिल्लीत – २१८७ भिकारी 

पूर्वोत्तर राज्यात भिकाऱ्यांची संख्या कमी

अरुणाचल प्रदेश – ११४,

नागालँडमध्ये – १२४

मिझोराममध्ये – ५३ भिकारी

दीव-दमणमध्ये २२ तर

लक्षद्वीपमध्ये – दोन भिकारी

 

COMMENTS