जो शपथविधी केला. तो काय होता? अमित शहा यांना भुजबळांचा सवाल

मुंबई – शिवसेना-भाजपची गेल्या पंचवीस वर्षाची युती संपुष्टात आल्यावर तब्बल एक वर्षानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर देत मी असे कुठलेही वचन दिले नव्हते. आम्ही जे काही वचन देतो तो बंद खोलीत देत नाहीत, असे अमित शहा यांनी सांगितले. यावर आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्ला चढवला.

भुजबळ म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीनंतर फडणवीसांना पहाटे सर्व जण झोपेत असताना जो शपथविधी केला. तो काय होता? असा सवाल केला.

सिंधुदुर्ग येथील सभेत अमित शहा म्हणाले होते की, आम्ही कुणालाही कसलेही आश्वासन दिले नव्हते. आम्ही वचन दिले हे सफेद झूठ आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेदरम्यान मी काही आश्वासन दिल्याचे सांगितलं जातं. मी कधीच बंद कमऱ्याचं पॉलिटिक्स करत नाही. जे आहे ते सडेतोड बोलतो. ठोकून बोलतो. उघड बोलतो. मी तु्म्हाला कधीच कोणतं आश्वासन दिले नव्हते. आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांना वचन दिले आणि ते पाळलेही असे सांगत शिवसेनेवर जोरदार टीका केली. भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उदघाटन आज अमित शहा यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ नका असं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी काही सेलिब्रिटींचं ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकण्यात आला होता का, याची महाराष्ट्र पोलीस चौकशी करणाहा आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

COMMENTS