विधानसभा अध्यक्षपदसाठी हे दावेदारी

विधानसभा अध्यक्षपदसाठी हे दावेदारी

मुंबई – काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यात काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये चुरस लागली आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सध्या काँग्रेसमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे दोन गट दिसतात. नाना पटोले यांनी विधानसभा सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभेच्या अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांच्यापासून के.सी.पाडवी यांच्या नावापर्यंत चर्चा होत आहे. सध्या के.सी. पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास विभागाची जबाबदारी आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने दिली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्री तर काँग्रेसच्या वाट्याला महसूलमंत्री, सार्वजनिक बांधकाम आणि विधानसभा अध्यक्ष ही तीन पदे दिली. महसूलमंत्री पद बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री पद अशोक चव्हाण आणि विधानसभा अध्यक्षपद नाना पटोले यांना दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कोणते पद द्यायचे हा मोठा प्रश्न होता. त्यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्याची चर्चा होती.

प्रदेशाध्यक्ष पद आक्रमक आणि तरुण नेत्याला देण्याबाबत पक्षश्रेष्टी आग्रही होते. त्यामुळे हे पद नाना पटोले यांना दिले. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाने सांगितला आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या संग्राम थोपटे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. त्यांच्या वडिलांपासून ते काँग्रेससोबत आहेत. तीन वेळा ते आमदार राहिले आहेत. मात्र, अद्याप त्यांना संधी न मिळाल्याने विधानसभा सभापती म्हणून काँग्रेस थोपटेंवर विश्वास दाखवू शकतं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यात थोपटे सभापती झाले तर विदर्भाला मिळालेला मान पुन्हा प. महाराष्ट्रात आलेला दिसेल.

COMMENTS