…तर हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही – अजित पवार

…तर हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला कर्जमाफी द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस भाग पाडेल. संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला. अजित पवार बारामती तालुक्यातील 13 नवनिर्वाचित सरपंच – सदस्यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, प्रत्येक गोष्टीवर या पुढील काळात आवाज उठवायला लागणार आहे. या सरकारला त्याशिवाय जागच येणार नाही. वीजबीले भरायला हवीत, याबाबत दुमत नाही. पण आताच्या घडीला शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने किमान हप्ते सरकारने बांधून घायला हवेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, कर्जमाफीचे पैसे त्याला मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत वीजबील कुठून भरणार, असा सवाल त्यांनी केला.  जिल्हापरिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या शासनाने कारखान्यांच्या अंतराबाबत काढलेला अध्यादेश चुकीचा असून, शेतकऱ्यांचे त्यामुळे नुकसान होणार आहे. 25किलोमीटरच्या आतील शेतकऱ्याला एक व त्यापेक्षा अधिक अंतरावरील दुसऱ्याला दुसरा न्याय असा सवाल त्यांनी केला. वीजबीलाबाबत शेतकऱ्यांना हप्ते पाडून देण्याची मागणी येत्या नागपूर अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

COMMENTS